सोलापूर : नीट तसेच युजीसी नेट परीक्षेत झालेल्या भ्रष्टाचार विरोधात बुधवारी दुपारी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या (डीवायएआय) विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केला.
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर बझार पोलिसांनी सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांची चौकशी करून त्यांची सुटका केली. डीवायएफआयचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी तसेच सचिव एड. अनिल वासम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा निघाला होता. पत्रकार भवन येथून मोर्चा निघाला. यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.