दुष्ट सरकारने ओबीसीच्या मुळावर घाव घातला आहे. त्यामुळे आज आपण विरोधासाठी रस्त्यावर नाही उतरलो तर पुढील पिढी माफ करणार नाही, असा घणाघाती हल्ला आमदार राम सातपुते यांनी केला. सरकारमधले ओबीसी मंत्री लाचार झाले आहेत. त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून विरोध करावा, असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला. आपल्या मागण्यांबाबत तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना निवेदन दिले.
यावेळी के. के. पाटील, हनुमंत सूळ, प्रकाश घोडके, बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, सोपान नारनवर, बी. वाय. राऊत, अक्षय वायकर, महादेव माने, नीलेश घाडगे, वैभव जानकर, संजय देशमुख, भाजपच्या नेतेमंडळींसह शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदविला.
----
ओबीसींची पारंपरिक लक्षवेधी वेषभूषा
सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, अशी घोषणाबाजी सुरू असतानाच गोंधळी, नाथपंथी, माळी, नाभिक, कुंभार, नंदिवाली, वैदू, डोंबारी, धनगर आपापल्या वेशात नृत्य करीत या मोर्चात सहभागी झाले. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शशिकांत शेळके व आदिनाथ महानवर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
----