अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करावे, या मागणीसाठी तीनही गावच्या ग्रामस्थांनी अकलूज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर २२ जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आज २०व्या दिवशी अकलूजच्या सरपंच पायल मोरे, दिग्विजय माने-पाटील, सदस्या रेश्मा गायकवाड, रेश्मा तांबोळी, नीता शिवरकर, ज्योती फुले, अकलूज किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील चंकेश्वरा, संतोष व्होरा, इंद्रराज दोशी, आनंद फडे, सचिन फडे, संतोष फडे, संतोष चंकेश्वरा, सुदर्शन गांधी, अनिल गांधी, जवाहर फडे, अभिनंदन गांधी, चंद्रशेखर दोशी, विश्वजीत गांधी, स्वाभिमानी होलार समाजाचे संजय गोरवे, लालासाहेब गेजगे, प्रशांत जाधव, अकलूज पांचाळ सोनार समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब वेदपाठक, संजय पोतदार, हर्षद लोहकरे, बालाजी दीक्षित, सुभाष पोतदार, अरुण क्षीरसागर, अमित लोहकरे, महेश भास्करे, प्रशांत भास्करे, महेश लोहकरे, दत्तात्रय पोतदार, सागर महामुनी, केदार लोहकरे, संजय लोहकरे यांच्यासह कर्मवीर गणेश मंडळ, दयावान ग्रुप, समता नगर, रणजितनगर, मसुदमळा येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वाभिमानी होलार समाज संघटना, वाघ्या-मुरळी कलावंत संघटना व पांचाळ सोनार समाज संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
110721\img-20210711-wa0034.jpg
स्वाभिमानी होलार समाजाच्यावतीने पारंपारिक वाद्यांचा गजर करीत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला