आंदोलनात जगन्नाथ गायकवाड, मळसिद्ध मुगळे, विश्वनाथ हिरेमठ, आप्पासाहेब मोटे, संगप्पा केरके, इरप्पा बिराजदार, अतुल गायकवाड, गौरीशंकर मेंडगुदले, हणमंत कुलकर्णी, यतीन शहा, संदीप टेळे, प्रशांत कडते, शशिकांत दुपारगुडे, अण्णाराव पाटील, अनिल धनाळी, बसवराज मुक्काणे, कासीम शेख, रायप्पा बने, महेश बगले, रमेश गिरीगौडर आदी उपस्थिती होते.
--------
नेत्यांविना लढाई
महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आम्ही सरकारच्या निर्णयाचा निषेध करतो. हवं तर आम्हाला अटक करा, आम्ही मागे हटणार नाही, जेलमध्ये जाण्याची आमची तयारी आहे, अशी भाषणे कार्यकर्ते ठोकत होते; पण या आंदोलनात भाजपचे वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती होती. नेत्यांविना लढण्याच्या लढाईत सेनापतीच नव्हते.
----
फोटो : २६ दक्षिण सोलापूर भाजप
ओळी : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी तेरा मैल येथे चक्का जाम आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते.