शेतकरी संघटनेने दिले निवेदन
बार्शी : राज्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरित विमाभरपाई द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी राज्याचे कृषी आयुक्त व पीक विम्याच्या राज्यप्रमुखांना पुणे येथील कार्यालयात निवेदननाद्वारे दिला आहे. यावेळी अमोल चौधरी, संदीप चौधरी, मनोज गवळी, गणेश चौधरी आदींसह शेतकरी उपस्थित होते. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली. मग विमा कंपन्या त्या पंचनाम्याच्या आधारे भरपाई का देत नाहीत. असा सवाल करून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांनी परतावा जमा केला नाही, तर विमा कंपनीच्या मालकांच्या घरावर व संबंधित सर्व कार्यालयांवर तीव्र स्वरूपाची आंदोलने केली जातील, असेही शंकर गायकवाड यांनी सांगितले.
===Photopath===
160621\20210610_144910.jpg
===Caption===
राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या.अन्यथा तीव्र आंदोलन..शंकर गायकवाड