राज्यात २७,८९६ हजार सरपंच ४३,०२५ गावचे गावकारभारी म्हणून गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना विरोधात लढत आहेत. राज्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट गावखेड्यात, वाड्या वस्तीवर पोहोचली आहे. सरपंच व कोरोना कृती समिती जिवाची बाजी लावून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका वाढला आहे. सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण आहे; पण या शासकीय यंत्रणेकडून काम करून घेणारा व सामाजिक उत्तरदायित्व निभावणाऱ्या सरपंचांना ना विमा संरक्षण ना प्राधान्याने लसीकरण त्यामुळे अनेक सरपंच राज्यभरात मयत झालेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांबरोबरच विमा आमच्याही हक्काचा आहे, आम्हाला कुटुंब आहे याची जाणीव ठेवून विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना पाठविण्यात आल्या आहेत.