संताजी शिंदे, सोलापूर: शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( चित्रपट साहित्य व कला सेल ) यांच्या वतीने चित्रपट सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी दयानंद महाविद्यालय व तेथील विद्यार्थ्यांसाठी 'अपघातावर आळा घालण्याकरिता कलेतून प्रबोधन व जनजागृती' या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी दयानंद कला शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एच. दामजी. दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे शिंदे, दयानंद विधी महाविद्यालयाचे गायकवाड, दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे क्षीरसागर व दयानंद विद्यालयाचे 'एनएसएस' विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. पथनाट्यामध्ये महामाया डावरे, रक्षिता बळुरगी, बजरंग होटकर, गुरुनाथ गोडसे, हनुमंत सलगर आदी कलाकाराने सहभाग घेतला होता.
पथनाट्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वेगात प्रवास केल्याने मोटारसायकलवरून झालेला अपघात, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सादर करण्यात आला. माझ्या मुलाला डॉक्टर व्हायच होतं, मात्र काळान घात केला हो आसा टाहो करत भावनिक पथनाट्य सादर करण्यात आले. शेवटी वाहन चालवण्याचे नियम सांगण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे चित्रपट साहित्य व कला सेलचे अध्यक्ष अशुतोष नाटकर, शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान, संगीता जोगदनकर, किरण माशाळकर, प्रकाश जाधव, इरफान शेख, नागेश निंबाळकर, सोमनाथ शिंदे, संतोष वेळापूरे, प्रकाश झाडबुके, प्रकाश मोटे, मैनोद्दिन इनामदार, आप्पासाहेब इटकळे आणि इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचा स्टाफ एनएसएसच्या चारही विभागाचे स्वयंसेवक, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.