आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ झाला़ शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्र शेटे यांच्या घरात हा विधी पार पडला़अक्षता सोहळ्याच्या आधी नववधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा, परंपरा आहे़ शिवयोगी सिद्धेश्वर महाराज सुमारे नऊशे वर्षांपूर्वी कै. रामचंद्र शेटे यांच्या वाड्यात येऊन जेवण केले होते़ तीच परंपरा आजही कायम ठेवून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड केळवणीसाठी शेटे यांच्या वाड्यात आणून केळीच्या पानात पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवून मनोभावे विधिवत पूजा करण्यात आली़ बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड कै. शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले़ यावेळी मानकरी हिरेहब्बू शेटे वाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून, विभूती, कुंकूम, फुले वाहून संबळाच्या निनादात विधिवत पूजा करण्यात आली़ यावेळी होमहवन करण्यात आले. शेटे यांचे वारसदार व मिलिंद थोबडे यांचा मुलगा अॅड़ रितेश थोबडे यांनी हिरेहब्बू यांची पाद्यपूजा केली़केळीच्या पानात योगदंडास नैवेद्य दाखविण्यात आला़ यावेळी अॅड़ मिलिंद थोबडे यांच्या आई विजया थोबडे, सुचेता थोबडे, ललिता थोबडे, मल्लिका थोबडे, महेश थोबडे, राजशेखर हिरेहब्बू, आनंद हब्बू, संदेश भोगडे, विजयकुमार हब्बू आदी उपस्थित होते़ शेटे यांचे वारसदार अॅड़ मिलिंद थोबडे यांचा १९८७ पासून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंडाची पूजा करण्याचा मान आहे़ योगदंडाच्या पूजनाला जानेवारी २०१२ साली अॅड़ मिलिंद थोबडे २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी आपले वारसदार व मुलगा अॅड़ रितेश थोबडे यांच्याकडे पूजा करण्याचा मान सुपूर्द केला़ ---------------------सिद्धरामेश्वरांनी दिली सर्वधर्माची शिकवण- योगदंडाच्या पूजेला मला हजर राहता आले हे माझे भाग्य समजतो़ १०० वर्षांपूर्वी बांधलेल्या या शेटे वाड्यात ही पूजा होत आहे़ मी आज सोलापुरात असल्यामुळे या पूजेला येऊ शकलो़ सिद्धरामेश्वरांच्या आशीर्वादाने आपण सोलापूरकरांना चांगले दिवस आले आहेत़ सिद्धेश्वरांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली़ हीच शिकवण आपणाला उत्साहित करून प्रेरणा देत असते, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.---------------श्री सिद्धरामेश्वर यात्रेची परंपरा सोलापुरात सुरू आहे़ धार्मिक विधी कार्यक्रम सुरू आहेत.आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की, या यात्रेच्या धार्मिक विधीचा मान आम्हाला मिळाला़ सिद्धेश्वरांची सेवा परंपरागत आमच्या घराण्याकडून अशीच सुरू राहील़ सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापुरात धार्मिक विधीला सुरुवात झाली आहे़ भक्तिमय वातावरणात अक्षता सोहळा पार पडणार आहे़ -अॅड़ मिलिंद थोबडे,ज्येष्ठ विधिज्ञ,-----------------सोलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा भरते़ संक्रांतीच्या आधी अक्षता सोहळा असतो़ संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी भक्त येतात़ सिद्धेश्वरांना प्रार्थना करते की, सर्वांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण होऊ दे़ सिद्धेश्वरांप्रति कृतज्ञतेची भावना शिंदे परिवार दरवर्षी व्यक्त करीत असतो़-आ़ प्रणिती शिंदे,शहर मध्य विधानसभा, सोलापूर
शेटे वाड्यातील योगदंडाची पूजेने सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य मान्यवरांची पूजेस हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:30 PM
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेतील धार्मिक विधीस प्रारंभ झाला़ शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्र शेटे यांच्या घरात हा विधी पार पडला़
ठळक मुद्देसिद्धरामेश्वरांनी दिली सर्वधर्माची शिकवण : सुशीलकुमार शिंदेसर्वांच्या आशा, आकांक्षा, इच्छा पूर्ण होऊ दे़ सिद्धेश्वरांप्रति कृतज्ञतेची भावना शिंदे परिवार दरवर्षी व्यक्त करीत असतो़ : आ़ प्रणिती शिंदेआम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो की, या यात्रेच्या धार्मिक विधीचा मान आम्हाला मिळाला़ : अॅड़ मिलिंद थोबडे