पंढरपूर : गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी आणि खुब्याचे विकार यासारख्या आजारांवर तपासणी, मार्गदर्शन व अत्याधुनिक उपचार करण्यासाठी पंढरपूर येथे ‘लोकमान्य आर्थो सुपरस्पेशालिटी ओपीडी’
सुरू करण्यात येत आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. अनुप पाचंगे हे २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता विठ्ठल ईन, गेडाम डायग्नोस्टिक सेंटर येथे तपासणी, मार्गदर्शन व उपचार करणार आहेत.
डॉ. अनुप पाचंगे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या डाॅ. नरेंद्र वैद्य यांच्या रोबोटिक असिस्टेडनी रिप्लेसमेंटच्या टीममधील प्रमुख जाॅइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. गुडघ्याच्या सांध्यामधील दोन हाडांच्यावरील आवरण असलेली कुर्चा खराब होते. आजकाल सर्जरीच्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झालेला आहे. आता रोबोटिकच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया केली जाते. लोकमान्य हाॅस्पिटलमध्ये आजपर्यंत २० हजारहून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ५ हजार रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून ७० हजारहून अन्य शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. लोकमान्य हाॅस्पिटल हे अमेरिकेबाहेर सर्वप्रथम रोबोटिक असिस्टेडने रिप्लेसमेंट सर्जरी होणारे पहिले सेंटर आहे. अत्यंत अचूकता, बिनचूक अलाइनमेंट, कमीत-कमी रक्तस्राव हे या शस्त्रक्रियेची वैशिष्टे आहेत.
यामुळे शस्त्रक्रियोत्तर हालचालीत सहजता, नैसर्गिकता येतो. गुडघेदुखीबरोबरच पाठदुखीसाठी या ठिकाणी तपासणी होणार आहे. मिनिमल इन्हॅसिव्ह स्वरूपातील उपचार रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. स्लीप डिस्क, स्पाँन्डेलायसिस, मणक्याच्या चकतीत गॅप येणे यासारख्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. (वा. प्र.)