शहरात व परिसरात काही दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढत चाललेले आहे. असे असतानाही रस्त्यावरील गर्दी मात्र काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर उतरून कारवाई मोहीम सुरू केली. त्यात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल सागर सुरवसे, पोलीस नाईक घोरपडे यांचा समावेश आहे.
पोलीस आपल्या ओळखीचे आहेत म्हणत फिरणाऱ्यांची संख्या जास्त
कुर्डूवाडी शहरात काही काम नसताना चौकातील पोलीस आपल्या ओळखीचे आहेत म्हणून फिरणारे, घरात किराणा असताना ही रोज पाव किलो वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानात जाणारे, डॉक्टरचे लेटर पॅड घेऊन रोज नवनवीन औषधे लिहून बाहेर पडणारे, विनामास्क फिरणारे व आपल्याला कोरोना होणार नाही, असा फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्यांना या कारवाईमुळे थोडी का होईना चपराक बसलेली आहे.
फोटो
१८कुर्डूवाडी-कारवाई
ओळी
कुर्डूवाडी शहरात विनामास्क व कारण नसताना रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी थांबलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी.