धनगर समाजाने या पुतळा समितीस विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सिध्दे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. एकूण १८ सदस्यांच्या या समितीत धनगर समाजाचे ११ सदस्य आहेत. त्यामुळे समाजावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे चौंडी हे जन्मगाव कर्जत जामखेड मतदारसंघातील आहे. ज्यांचा पुतळा उभारला जात आहे त्यांच्या जन्मगावाचा लोकप्रतिनिधी म्हणून आ. रोहित पवार यांचा समितीत समावेश आहे. या मतदारसंघातील धनगर समाजबांधवानी निवडून दिलेला नेता समितीत असेल तर ही बाब समाज बांधवांसाठी अभिमानास्पद आहे. तरी आहे हीच पुतळा समिती अंतिम ठेवून लवकरात लवकर पुतळा उभारणी कामाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मनोज निकम, महादेव वाले, प्रकाश सुरवसे, वाहीद वळसंगकर, विक्रांत पिसे, माणिक बिराजदार, शंकर वहनमाने, शिवराज स्वामी, राम जाधव, राजरतन बाणेगाव, शंकर पाटील, अर्जुल बनसोडे, विशाल राठौर, इस्माईल फुलारी, संजय घोडके, राहुल किरनळळी उपस्थितीत होते.