शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

टेंडरमध्ये अडकली सोलापूर जिल्हा परिषदेची आरोग्य साहित्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2020 9:46 AM

२ कोटी ४ लाख महिन्यापासून अखर्चित; डॉक्टर, आरोग्य सेवक, अंगणवाडी कर्मचारी, आशांना हवे आहेत सुरक्षा किट...!

सोलापूर : जिल्ह्यात 'कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काम करणाºया डॉक्टर व कर्मचाºयांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी एक महिन्यापूर्वी जिल्हा वार्षिक नियोजनमधून दिलेला २ कोटी ४ लाखाचा निधी खर्चाविना पडून असल्याचे दिसून आले आहे.

'कोरोना' साथीसाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा अंमल लागू केला. सर्व यंत्रणांना कोरोना प्रतिबंधासाठी काम करण्यासाठी सूचना दिल्या. जिल्ह्यातील ३५ लाख लोकांचे आरोग्य कोरोनापासून दूर रहावे यासाठी आरोग्य खात्यातील डॉक्टर व कर्मचाºयांना काम करण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान जिल्ह्यात पुणे, मुंबई व इतर राज्यातून लोक मोठ्या प्रमाणावर आले. त्यामुळे अशा लोकांचे सर्वेक्षण व उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचाºयांनी वारंवार सुरक्षा साहित्याची मागणी केली, पण जिल्हा आरोग्य कार्यालयातर्फे या साहित्याचा अत्यल्प प्रमाणात पुरवठा करण्यात आला.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ३१ मार्च रोजी कर्मचाºयांना साधने देण्यासाठी २ कोटी ४ लाख ५३ हजार इतका निधी वर्ग केला. पण जिल्हा आरोग्य कार्यालय अद्याप साहित्य खरेदीच्या टेंडर प्रक्रियेतच अडकल्याचे दिसून आले आहे. कोरोना संपून गेल्यावर साहित्य देणार का असा संतप्त सवाल आता झेडपीचे कर्मचारी करीत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाची साथ पसरून महिना झाला तरी खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता इतक्या उशिरा पुरवठादार कोण भेटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.–--------------अशी आहे आरोग्य यंत्रणा

सिव्हिल हॉस्पीटल, तीन उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय:१४,आरोग्य केंद्र : ७७, उपकेंद्र: ४२७, झेडपी आरोग्य कर्मचारी: १0९0 (मंजूर पदे: १५७२), शल्य चिकित्सक कर्मचारी: २५३ (३१७), राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी: ३२१९ (३२४२), आशा: २७७४ (२७८0), यातील फक्त ४५६२ जणांना कोरोना प्रतिबंधाचे प्रशिक्षण दिले आहे. वरीष्ठ कार्यालयाकडून साधने पुणे आरोग्य उपसंचालकांकडून मास्क: दीड हजार, ट्रिपल लेअर: १0 हजार, हेड्रोक्झी क्लोरोक्वीन गोळ्या: १0 हजार नग. जिल्हा शल्य चिकित्सकांसाठी मास्क: ६ हजार ७५0, पीपीई कीट: ७५ नग, थ्री लेअर मास्क: २0 हजार, गोळ्या ५५ हजार. पण प्रत्यक्षात यातील साहित्य कर्मचाºयांपर्यंत पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत.----------------डीपीसीकडून आलेल्या निधीतून साहित्य खरेदीसाठी निविदा मागविली आहे यात मास्क, पीपीई किट, हॅन्डग्लोज, पावडर, ईसीजी मशीन, व्हीटीएम किट मल्टी पॅरा मॉनिटर, पल्स अ‍ॅक्सीमीटर टेबल खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.- प्रकाश वायचळ,

मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय