शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

पौर्णिमा-मयुरी नगरकर पार्टी प्रथम, अकलूज येथे राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा समारोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:11 PM

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या २६व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात सणसवाडीच्या जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र्रातील पौर्णिमा-मयुरी नगरकर संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला़ आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले़

ठळक मुद्देशंकरनगर अकलूज येथील स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर स़ म़ शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने ६ व ७ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा पार पडल्या़अकलूजच्या स्पर्धेत शांतपणे, शिस्तीत लावणी ऐकायला व पाहायला मिळतेएका उंचीवर पोहोचलेली ही लावणी स्पर्धा बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला - जयसिंह मोहिते-पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरअकलूज दि ९  : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या २६व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत पारंपरिक गटात सणसवाडीच्या जय अंबिका लोकनाट्य कला केंद्र्रातील पौर्णिमा-मयुरी नगरकर संगीत पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला़ आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते रोख २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले़शंकरनगर अकलूज येथील स्मृतीभवनच्या बादशाही रंगमंचावर स़ म़ शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने ६ व ७ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा पार पडल्या़ बक्षीस वितरण आ़ दिलीप सोपल यांच्या हस्ते व जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.यावेळी रंगमंचावर परीक्षक डॉ़ शशिकांत चौधरी, प्राचार्य मधुकरराव गायकवाड, डॉ़ सुवर्णा निंबाळकर, राजश्री नगरकर, सरलाताई नांदुरेकर, पांडुरंग घोटकर, कमलताई जाधव, मीनाताई परभणीकर, रेश्मा परितेकर, वैशाली जाधव-परभणीकर, प्रमिला लोदगेकर यांच्यासह थिएटर मालक व जयंती समारंभ समितीचे सदस्य उपस्थित होते.आ़ दिलीप सोपल म्हणाले, यावर्षी लावणी स्पर्धेत थोडी खुशी थोडा गम असे वातावरण होते. अनेकांना वाटत होते ही लावणी स्पर्धा अशीच पुढे चालू राहावी. परंतु बाळदादांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. प्रेक्षक व कलावंतांच्या वतीने जयंती समारंभ समितीला विनंती आहे, ज्या लावणीला अकलूजकरांनी महाराष्ट्रासह देश-विदेशात प्रतिष्ठा मिळवून दिली ती लावणी बंद करू नये. या लावणी स्पर्धेमुळे कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळतो. अकलूजच्या स्पर्धेत शांतपणे, शिस्तीत लावणी ऐकायला व पाहायला मिळते. हे वातावरण इतरत्र नाही. सहकार महर्षींनी धाडसाने पुढे येऊन प्रसंगी पांढरपेशी समाजाची टीका सहन करून लावणीला राजाश्रय दिला. त्या लावणीचा आता कंटाळा करू नये. थिएटर मालकांनी या स्पर्धेत पार्ट्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, लावणी स्पर्धा बंद करण्यामागे कोणतेही अर्थकारण नाही. पूर्वी ज्या संख्येने व उत्साहाने संगीत पार्ट्या सहभागी होत होत्या, तो उत्साह त्या पार्ट्यांमध्ये आता राहिला नाही. लावणीसाठी जी मेहनत घ्यावी लागते ती मेहनत आज कलाकार घेत नाहीत. त्यामुळे एका उंचीवर पोहोचलेली ही लावणी स्पर्धा बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. तरीही थिएटर मालक व कलाकार यांनी साथ दिली तर नक्कीच विचार करू, असे सांगत थिएटर मालक, कलाकार, संयोजन समितीची खा़ विजयसिंह मोहिते-पाटील व आ़ दिलीप सोपल यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय जाहीर केला जाईल़ त्या बैठकीत जर सकारात्मक निर्णय झाला तरच लावणीची सूत्रे पुढच्या पिढीकडे सोपविण्याचा मी विचार करेन, असेही ते म्हणाले.---------------अन्य पुरस्कारप्राप्त पार्ट्या, वैयक्तिक बक्षिसेलावणी नृत्य स्पर्धेतील द्वितीय क्रमांकासह २० हजारांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी, यवत-चौफुला जि. पुणे, तृतीय क्रमांक विभागून रू. १५ हजार व स्मृतिचिन्ह बबनबाई मीरा पडसाळीकर, पद्मावती कला केंद्र मोडनिंब व नंदा उमा इस्लामपूरकर नटराज लोकनाट्य कला केंद्र, मोडनिंब यांना देण्यात आला. उत्कृष्ट मुजरा न्यू अंबिका कला केंद्र ग्रुप पार्टी, चौफुला, उत्कृष्ट ढोलकी पल्लवी जाधव (स्वरांजली कला केंद्र, मोडनिंब), उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी (शामल सुनीता स्नेहा लखनगावकर, मोडनिंब), उत्कृष्ट पेटीवादक मनोज कुडाळकर (नंदा उमा इस्लामपूरकर, मोडनिंब) व उत्कृष्ट तबलावादक अजय डावाळकर (नटराज लोकनाट्य कला केंद्र, मोडनिंब) यांना देण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील