मंगळवेढा : नोटाबंदीच्या नावाखाली नोटा बदलण्याच्या पाठीमागे दोन दिवसात कोट्यवधी रुपये कमवायचा हेतू होता, म्हणून काळ्या पैशाचे भूत जनतेसमोर आणले. या भीतीपोटी लोकांनी कमिशन देऊन नोटा बदलून घेतल्या. ४०-६० चा रेषो होता. हा ४० टक्क्यांचा निधी आता निवडणुकीत वापरला जाऊन पुन्हा सत्ता घेण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केली.
मंगळवेढा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ व्यासपीठावर लक्ष्मण गायकवाड, इसार शेख, अण्णाराव पाटील, माऊली हळणकर, विकास दुधाळ, महादेव ढोणे, अशोक माने, सोमनाथ ढावरे, सुनील शिंदे, वैशाली सावंत, उषा चव्हाण, निकिता सोनवणे, लक्ष्मी ससाणे, अंकुश शेवडे, विकास दुधाळ, नितीन साळवे, महेश कांबळे आदी उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी मीपणा दाखवण्याच्या नादात आपले सिक्रेट जगासमोर आणले. साºया गुप्ततेचा भंग केला. शस्त्रे ही जपून ठेवायची असतात. संकटाच्या काळात त्याचा वापर केला तर शत्रूवर अधिक परिणाम होतो. सैन्यबल व शस्त्रबल अधिक असल्यामुळे आपण पुढे होतो. आपली शस्त्रे बाहेर काढल्याने पाकिस्तानवर आपले असलेले वर्चस्व सरकारने घालवल्याची टीका त्यांनी केली.
सोलापूरमध्ये १२०० कोटींचा कोळशाचा प्रकल्प आणून जनतेला फसविण्याचे काम केले आहे़ हा प्रकल्प आणणाºया व्यक्तीला मी महामूर्ख म्हणतो़ राज्यात व देशामध्ये एक-दोन लोकप्रतिनिधी निवडून येऊन उपयोग नाही, यांची सत्ता मुळासकट उपटली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.