करमाळा : लॉकडाऊन काळात काम गेले. काही तरी व्यवसाय करावा म्हणून मालवाहतुकीचे वाहन आणायला अकलूजकडे निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला. करमाळा तालुक्यात मांगीजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
एक गाडी विकायची आहे, असं समजले तिचे फोटो मोबाइलवर पहिले आणि किंमतही ठरली. पैसे द्यायचे आणि गाडी घेऊन यायचे असं ठरवून दुचाकीवर भाऊ आणि मेहुणा निघाले. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला. नगर- करमाळा रस्त्यावर मांगीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिली त्यात ते ठार झाले.
लक्ष्मण मुकिंदा लोखंडे (रा. आरोळे वस्ती, जामखेड) व महेश गुलाब शिंदे (रा. अकलूज) असे मरण पावलेल्या दोघांची नावे असून, रविवारी सकाळी हा अपघात घडला.
लॉकडाऊन काळात कोरोनाने नोकरी हिरावल्याने या दोघांना छोटासा व्यवसाय करायची कल्पना सुचली. या व्यवसायासाठी छोटाहत्ती हे मालवाहतुकीचे वाहन त्यांना आवश्यक होते. या वाहनाची जाहिरात एके ठिकाणी वाचली आणि त्याबाबत संबंधित वाहनमालकांशी त्यांनी बोलणी केली. हे वाहन आणण्यासाठी ३० मे रोजी लक्ष्मण लोखंडे आणि महेश शिंदे हे दोघे अकलूज येथे निघाले होते. मांगीजवळ येताच एक वाहन यांच्या दुचाकीला धकडून पुढे निघून गेले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि त्यांचे सहकारी हे घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.