पंढरपूर : राम मंदिर हा कोणत्या पक्षाचा किंवा राजकीय विषय नव्हे तर तो देशाच्या आस्मितेचा विषय आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खा़ संजय राऊत यांनी केले.
२४ डिसेंबर रोजी पंढरपुरातील चंद्रभागा मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंदू महासभा होणार आहे़ त्यानिमित्त मैदानाची व तयारीची पाहणी करण्यासाठी ते शुक्रवारी पंढरपुरात आले होते़ तेव्हा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
राममंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी आयोध्यात सभा घेतली़ बाहेरील राज्यातही चांगला प्रतिसाद मिळाला़ या सभेची देशाने दखल घेतली़ त्यानंतर दक्षिण काशी समजल्या जाणाºया पंढरपुरात महासभा होणार आहे़ ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशीच होईल़ मैदानाची पाहणी केल्यानंतर मैदान मोठे तर आहेच पण तेही कमी पडेल, असे वाटते़ शिवसेनेला एक धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे़ त्यामुळे राममंदिर हा हिंदूच्या अस्मितेचा विषय आहे़ हे मंदिर व्हावे ही शिवसेनेची भूमिका आहे. पंढरपूरचा पांडुरंग हा कष्टकरी, शेतकरी, कामगार, गोरगरीबांवा देव आहे़ मुंबईतही बहुसंख्य कामगार आहेत़ देवांचे आणि कष्टकºयाचे आशीर्वाद घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहणार आहोत़ सेना सत्तेत असली तरी शेतकºयांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहिली आहे़ सेनेच्या दबावामुळेच आता पंतप्रधान हेही ४ लाख कोटी शेतकºयांची कर्जमाफी देण्याच्या तयारीत आहेत़ त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळेल़ झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे़ नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-सेनेची युती होणार असल्याचे जाहीर केले़ त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत़ शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे हे सरकार सुस्थितीत चालू आहे़ त्यांना विचार करूनच बोलावे लागते़तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली विशेषत: मध्यप्रदेशात सेनेच्या उमेदवारांमुळे भाजपाचे काही उमेदवार थोड्याफार मतांनी पराभूत झाले़ यावर बोलाताना संजय राऊत म्हणाले, कोणाला पाडण्यासाठी आम्ही लढलो नाही तर शिवसेनेचा विस्तार अन्य राज्यातही व्हावा, म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते.