शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

‘लोकमत’ बांधावर; नोकरी सोडून पैसा ओतला शेतात, पिकासह भविष्यही ‘बुडालं’ पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 2:45 PM

माळशिरस तालुका; अतिवृष्टीच्या तडाख्यात लाखाचे झाले बारा हजार

ठळक मुद्दे सध्या कोसळणाºया पावसाने ही पिके शेवटच्या घटका मोजत आहेतउपासमारीने शिकार बनलेली जनावरेही विविध रोगांच्या विळख्यात सापडली यंदा लाखो रुपये शेतीत खर्च झाला मात्र उत्पन्न हजारात घ्यावे लागले आहे

एल. डी. वाघमारे 

माळशिरस: माळशिरस तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कृषी अर्थकारणात कोट्यवधी रुपये गुंतवणूक करून पूर्वी दुष्काळानंतर साध्या अतिवृष्टीने काही हजारात तुटपुंजे उत्पन्न गाठीशी आल्याने सध्या शेतकरी कोलमडलेल्या स्थितीत आहे. ‘लाखाचे बारा हजार’ या म्हणीप्रमाणे सध्या तालुक्यातील शेतकºयांची स्थिती झाली आहे. भांब (ता. माळशिरस) येथील शेंडगे कुटुंबाने गेल्या दिवाळी ते या दिवाळीपर्यंत शेतीसाठी व जनावरांच्या चाºयासाठी १ लाख ४० हजार खर्च केला. मात्र उत्पन्न आलं ६ पोती काळपट पडलेली बाजरी अन् मरतुकडी जनावरं.

तालुक्यातील सोळा गावांच्या दुष्काळी पट्ट्याबरोबर अनेक गावे यंदा दुष्काळाने होरपळून निघाली आहेत. कण्हेर, भांब गावच्या शिवेवर राहणारे शेतकरी बापू नामदेव शेंडगे यांच्या पत्नी लक्ष्मी दोन मुले शैलेश, अमृत व मुलगी अशा कुटुंबाकडे सहा-सात एकर जमिनीत वर्षभरात मशागत व बियाण्यासाठी १ लाख ५ हजार रुपये १ वर्षात वापरले तर दोन म्हशी, दोन गाई व शेळ्या १५ वैरण-चारा मिळेल तिथनं विकत घेताना ३० हजार रुपये गेले मात्र गतवर्षीच्या रब्बीत पेरलेलं उगवलं नाही तर यंदा खरिपातील ४ एकर पेरलेल्या बाजरी काढणीला येताच सुरू झालेल्या पावसात अवघी ६ पोती काळपट रंगाची बाजरी पदरात पडली तर २ एकर कांदा, १ एकर ज्वारी, १ एकर मका पेरली होती. मात्र सध्या कोसळणाºया पावसाने ही पिके शेवटच्या घटका मोजत आहेत. उपासमारीने शिकार बनलेली जनावरेही विविध रोगांच्या विळख्यात सापडली आहेत. एकूणच यंदा लाखो रुपये शेतीत खर्च झाला मात्र उत्पन्न हजारात घ्यावे लागले आहे.

आलेला पैसा गुंतविला शेतीत- गावाला दुष्काळाचा कलंक असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी या कुटुंबातील मोठा मुलगा अमृत यांनी डी.एड. शिक्षण करूनही नोकरी नसल्याने पुण्यात भाजीपाला बाजारात नोकरी स्वीकारली तर दुसरा मुलगा अमृत याने डिप्लोमा करून पुण्यात खासगी नोकरी स्वीकारली. वडिलांना पायाचा आजार आहे तर आई शेळ्या राखून संसार चालविते. दोन भावांनी आपल्या आई-वडिलांना सांभाळत शेतीतून उत्पन्न मिळेल, या आशेने वर्षभरात दीड लाखांपर्यंत पैसे खर्च केले. मात्र मागे दुष्काळाने तर सध्या अतिवृष्टीने या लाखाचे बारा हजार केले. ही स्थिती सध्या तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील पंचवीस-तीस गावातील शेतकºयांची आहे. कोट्यवधी रुपये जमिनीत गुंतवले मात्र हाती पदरी अद्यापही निराशाच आहे.

शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल, या आशेने मुलांनी शहरात नोकºया करून शेतीसाठी मशागती जनावरांसाठी चारा घेण्यासाठी पैसे खर्च केले. मात्र दुष्काळ व अतिवृष्टी असा निसर्गाचा फटका असे यावर्षी नुकसानच सोसावे लागले. आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा ही मशागत व बियाण्यासाठी पैसा गुंतवावा लागणारच आहे.- बापू शेंडगे, शेतकरी कण्हेर

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरीLokmat Eventलोकमत इव्हेंट