त्यावेळी, पिंटू उर्फ संजीव सातपुते, सतीश सातपुते, नागेश अक्कलकोटे हे सुमो गाडीतून तेथे आले. तेव्हा गावातील भगवंत पाटील, जवाहरमल पाटील, बापू पाटील श्रीराम उर्फ समाधान कोंढारे, प्रकाश कोंढारे, विनायक कोंढारे हेही तेथे गोळा झाले. यावेळी भगवंत पाटील यांनी समाधान तुपेरे यांस जातिवाचक शिवीगाळ केली. तलवारीने मारले, विनायक कोंढारे यांनी गजाने मारले, अक्कलकोटे यांनी ब्लेडने मारले व इतरांनी काठीने मारहाण केली. गावकऱ्यांनी सोडवासोडवी केल्यानंतर ते निघून गेले, अशी फिर्याद पांगरी पोलिसांत दिली होती.
त्यानुसार, वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात नं.१ ते ३ तर्फे ॲड. मिलिंद थोबडे, निखिल पाटील, आरोपी नं.४ ते ९ तर्फे ॲड. धनंजय माने यांनी, तर सरकारतर्फे ॲड.पी.ए. बोचरे यांनी काम पहिले.