वेळोवेळी उचललेली रक्कम आम्ही वापरली नाही, असे कर्मचारी सांगू लागल्याने या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी महादेव गोडसे व नागनाथ पवार यांच्यावर सोपवली होती. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी लेखी म्हणणे सादर केले. त्यात त्यांनी सहायक व्यवस्थापक (लेखा) चंद्रकांत हैनाळ यांचे नाव सांगितले. आमच्या नावावर दिलेली अनामत हैनाळ यांना दिल्याचे लेखी दिल्याने हैनाळ यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. मात्र, संघाचे २० लाख रुपये वसूल झाले नाहीत.
----
यांनी उचलली अनामत
अजित महासागर ३ लाख ४९ हजार, म.शफी मनियार एक लाख ७५ हजार, कल्याण भोईटे दोन लाख ६० हजार, जगन्नाथ कुलकर्णी ५ लाख ३५ हजार ७०० रुपये, नागनाथ पवार एक लाख ५० हजार, बाळू थोरात एक लाख रुपये, महादेव भांगे दोन लाख ७५ हजार, शिवाजी गायकवाड ९६ हजार ५७९ रुपये, नामदेव नाईकनवरे ५५ हजार, पांडुरंग ताकमोगे २० हजार, गजानन अडगळे तीन हजार ५०० रुपये.
----
व्यवस्थापनाशी संगनमत करून कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य ॲडव्हान्स उचलले आहे. बुडविण्याचा उद्देश ठेऊन ही रक्कम थकीत ठेवली आहे. संबंधितांनी रक्कम भरावी अन्यथा गुन्हे दाखल केले जातील.
- श्रीनिवास पांढरे, अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ दूध संघ
---