शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

सोलापूरच्या पोलिसांमुळं एमएच - १३ क्रमांकाची गाडी परराज्यात रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 2:28 PM

खरंय सोलापूरच्या पोलीसांकडून हायवेवर प्रचंड लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया

ठळक मुद्देमुंबई, पुण्यासह आंंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून येणाºया जाणाºयांची संख्या मोठीसर्व खासगी वाहनांना सोलापुरातून बायपासमार्गे जावे लागते नेमके नाक्याच्या ठिकाणी थांबून शहर वाहतूक शाखेचे पोलीस सर्व बाहेरील जिल्ह्यातील व परराज्यातील वाहनांना अडवतात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एम.एच. १३ क्रमांकाची गाडी परराज्यात दिसली की, सूड भावनेने तेथील वाहतूक शाखेचे पोलीस जाणीवपूर्वक अडवतात. सोलापूरच्या पोलिसांमुळेच एम.एच. १३ रडारवर असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त केली जात आहे. 

लोकमतने मंगळवारी शहराबाहेरील नाक्यावर स्टिंग आॅपरेशन करण्यात आले होते. स्टिंग आॅपरेशनबाबत जिल्ह्यातील व बाहेरील लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंय...हायवेवर प्रचंड लूट होते आणि मानसिक ताण पण येतो. नेहमीच हायवेवरून ये-जा करताना हे दृष्टीस पडते. दररोज हजारो रुपये कमावले जातात, पण लक्ष कुणाचं नाही. कदाचित यामुळेच परराज्यात एम.एच.-१३ ही गाडी दिसली की तेथील ट्रॅफिक पोलीस अडवतात. चौकशी करतात, हे सर्व जाणीवपूर्वक केले जातं असा आरोप सोशल मीडियावर लोकांकडून होत आहे. 

मुंबई, पुण्यासह आंंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून येणाºया जाणाºयांची संख्या मोठी आहे. सर्व खासगी वाहनांना सोलापुरातून बायपासमार्गे जावे लागते. नेमके नाक्याच्या ठिकाणी थांबून शहर वाहतूक शाखेचे पोलीस सर्व बाहेरील जिल्ह्यातील व परराज्यातील वाहनांना अडवतात. गरज नसताना त्यांना विविध कागदपत्रांची मागणी करून चुका दाखवतात. शेवटी दंडाची रक्कम भरण्यास सांगून सोडून देतात. सर्रास या प्रकाराचा अनुभव प्रवाशांना सोलापुरातच येतो. प्रवाशांना वेळ नसतो, नसती कटकट नको म्हणून ही मंडळी दंडाची रक्कम भरून निघून जातात; मात्र सोलापुरातील हा अनुभव सोबत नेतात. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे सोलापूर पुरतं बदनाम होत आहे. एकीकडे शहर स्मार्ट होत असताना पोलिसांनीही स्मार्ट होत आपल्या शहराची, जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्यासाठी पाऊले उचलावीत अशाही भावना सोलापूरकरांमधून उमटत आहेत.

सोलापुरातील पोलीस अती करीत आहेत : प्रवासी- सोलापुरातील वाहतूक शाखेचे पोलीस अती करीत आहेत, मी दि.१२ जून २0१९ रोजी सकाळी ६ वाजता नांदेड, लातूर, तुळजापूर, सोलापूर असा प्रवास केला. दोन दिवसात मला कोणत्याही वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवले नाही. कागदपत्रांची मागणी केली नाही, त्या शहरात पण ट्रॅफिक पोलीस होते. १३ जून रोजी मी जेव्हा सोलापुरात प्रवेश केला तेव्हा माझी गाडी अडवण्यात आली. गाडीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली, लायसन्स तपासण्यात आले. मला वाटते भारतात गाडी अडवण्यासाठीचे विशेष अधिकार सोलापूर वाहतूक पोलिसांनाच दिले आहेत का काय? असा सवाल राजेश जगताप या प्रवाशाने सोशल मीडियावर केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसTrafficवाहतूक कोंडी