बार्शी : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत घेतलेले निर्णय सर्वसामान्यांचा गळा घोटणारे ठरले आहेत. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या देशविघातक सत्ताधाºयांना आता पायउतार करण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पदाधिकाºयांनी बार्शी येथे घेतलेल्या सभेतून केला.
संयुक्त पुरोगामी आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शीतील गांधी पुतळा चौकात काँग्रेसने सभा घेतली.
यावेळी शहराध्यक्ष अॅड. जीवनदत्त आरगडे म्हणाले, नरेंद्र मोदींच्या शंभर चुका झाल्या आहेत. राफेल विमान खरेदी गैरव्यवहार, क्लिष्ट करुन टाकलेली जीएसटी, सर्वसामान्यांचा अंत पाहणारी नोटबंदी, फसवी कर्जमाफी, पीकविम्याच्या बाबतीत कंपनी धार्जिणे धोरण, इंधन, गॅसचे गगनाला भिडलेले दर, या बाबी सरकारचा भ्रष्ट व अपयशी कारभार स्पष्ट करण्यास पुरेसे आहेत, सर्वसामान्य जगणे मुश्किल करुन टाकलेल्या या सरकारला आता पायउतार करा, असे आवाहन त्यांनी मतदारांनी केले.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष तानाजीराव जगदाळे, शहर उपाध्यक्ष, निलेश मांजरे पाटील, इस्माईल पठाण, युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष सचिन तूपसमिंदर, बार्शी शहर महिला अध्यक्षा सुमन महाजन, महिला संघटक अॅड. निवेदिता आरगडे तालुका सेवा दल अध्यक्षा शीलाताई हिंगे, महिला सेवा दल शहर अध्यक्षा सुनीता गायकवाड, विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निखिल मस्के, विद्यार्थी शहर अध्यक्ष केशव मुकटे, प्रवक्ते प्रा. पंकज पवार, जहिर बागवान, ईश्वर व्हनकळस उपस्थित होते.
भावनिक बोलून विकास होत नाही : पद्मसिंह पाटील- महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. यावेळी विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले, केवळ भावनिक बोलून, घराणेशाहीवर विकास होत नसतो़ आम्ही नैसर्गिक संकटांना तोंड देवून पाटबंधाºयाचे अनेक प्रकल्प निर्मिले़ तेरणाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणली़ आज त्याचे वाटोळे कोणी केले, हे उस्मानाबादच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे़