मुद्देमाल तर गूळमिश्रित हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकली. यात ११ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली.
१३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
याबाबत शहर पोलिसात रिक्षाचालक अक्षय मुकुंद राऊत (वय- २२, रा. कसबा पेठ, बार्शी) गूळमिश्रित रसायन साठा करणाऱ्या सुनीता भारत चव्हाण (वय- ४५, रा. गुळमे वस्ती, लातूर बायपास) व हातभट्टी विक्री करणारे शुभम महादेव जानराव, दयानंद छगन लंकेश्वर (रा. सिद्धार्थनगर) व जमीर अन्सार पटेल, गडेगाव रोड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रानुसार पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापे टाकले. त्यात रिक्षातून (एम. एच. १३ सीटी ५७७९) विनापरवाना विदेशी दारू घेऊन जात होता. पोलिसांनी त्याला अडवून ४३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर गुळमे वस्तीजवळ सुनीता चव्हाण यांच्याकडे हातभट्टीसाठी लागणारा ८ हजारांचा गूळमिश्रित साठा जागीच नष्ट केला. यातील इतर तिघेजण प्लास्टिकच्या पिशवीतून हातभट्टीची दारूची विक्री करत असताना त्यांनाही ताब्यात घेऊन गुन्हे नोंदले.
----