बार्शी : तुळजापूर रोडवर पाण्याच्या टाकीखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बार्शी पोलिसांनी धाड टाकून दोन दुचाकीसह १ लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी रात्री बार्शी शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून, याबाबत अर्जुन गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शंकर रमेश जगताप (वय ३१) , रहिम अल्लाऊद्दीन शेख ( वय ३०, दोघे रा. मंगडे चाळ), स्वप्नील सतीश तांबे (वय २१, रा.यशवंत नगर) , आकाश नवनाथ लाकाळ (वय २८), सुरेश गोविंद जाधव (वय ४०), अनिल चंद्रकांत जाधव (वय ३०), बालाजी बाबासाहेब थोरे (वय २९) , मोहन अनिल शिंदे ( वय २०, सर्व रा. पाटील चाळ, बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फौजदार अमोल ननवरे, सहायक फौजदार अजित वरपे, पोलीस बारगिर, घोंगडे, लगदिवे, जर्हाड व घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास सहायक फौजदार अजित वरपे करत आहेत.