मोहोळ : अर्जुनसोंड पाटीजवळ रस्त्याच्या कडेला झाडाखाली सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी दोन मोटारसायकली, नऊ मोबाईल अशा दीड लाखाच्या मुद्देमालासह आठ जणांना ताब्यात घेतले.
२० मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनसोंड पाटीजवळ रोडच्या कडेला एका झाडाखाली काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे, दळवी यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली असता जुगाराचे साहित्य आणि मोटारसायकलीसह आठजण मिळून आले. या कारवाई दरम्यान बापू रणदिवे (मोहोळ), सिद्धार्थ कुंभार (मोरवंची), अशोक यादव (शिरापूर) ,प्रकाश जमदाडे (अर्जुंसोंड), विष्णू गायकवाड (अर्जुनसोंड), कृष्णदेव घरबूडे (शिरापूर), उत्तम मसलकर (शिरापूर), तानाजी भोसले (अर्जुंसोंड) हे आठ जण जुगार खेळताना आढळून आले.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल हरिदास मुसळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार कटकधोंड करीत आहेत.