पोलिसांनी एजंट दत्तात्रय पांडुरंग घोडके (रा. लेंडवेचिंचाळे, ता. मंगळवेढा), सागर भगवान बनसोडे (रा. गोडसेवाडी, सांगोला), दिनेश विठ्ठल ननवरे (रा. कडलास), बबलू शिवाजी भोसले (रा. वाढेगाव नाका, सांगोला), समीर गुलाब शेख (रा. सिद्धार्थनगर-बारामती, जि. पुणे), लॉज मालक जयसिंग सोना पवार (रा.नाझरे, ता. सांगोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गोपनीय माहितीच्या आधारे सांगोला-मिरज रोडवरील हाॅटेल प्रिन्सराज लाॅजवर वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहा. पोलीस फौजदार कल्याण ढवणे, हवालदार धुळा चोरमले, महिला पोलीस कर्मचारी चौगुले यांच्या पथकाने गुरुवारी या लाॅजवर अचानक छापा टाकला. वरील ६ पैकी दोन एजंट, लाॅज मालक आपापसात संगनमताने पश्चिम बंगाल येथून महाराष्ट्रात दोघी पीडिताकडून वेश्याव्यवसायाद्वारे त्यांचे लैंगिक शोषण केले. स्वतःच्या फायद्याकरिता पैसे कमविण्याच्या इराद्याने लबाडी करून फसवून पैसे मिळवत होते. वेगवेगळ्या ग्राहकांना आकर्षित करून वेश्या व्यवसाय करताना महिलेसह आढळून आले. याबाबत सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी सरकारतर्फे लाॅज मालक, एजंट अशा ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करीत आहेत.