अक्कलकोट : खानापूर (ता. अक्कलकोट) येथे भीमा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या वाळू उपशावर महसूल विभागाने छापा टाकून सात ब्रास वाळूसह पाच वाहने असा १८ लाख ४९ हजारांचा ऐवज जप्त केला. जप्त केलेली वाहने ही अक्कलकोट तहसील कार्यालयात आणून लावण्यात आली आहेत.
२७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महसूलच्या पथकाने ही कारवाई केली. खानापूर परिसरात नदीपात्रातून काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू होता. रात्रीच्या वेळी प्रभारी मंडल अधिकारी राणा वाघमारे, सुभाष धर्मसाले, तलाठी मारुती कोळी, एस. पी. पाटील, बसवराज कुंभार, अव्वल कारकून संजय सोनटक्के, कोतवाल जगन्नाथ देसाई, औधूसिद्ध पुजारी, अनिलकुमार जमादार, हवालदार उपासे यांच्या पथकाने या वाळू उपशावर छापा टाकला. यावेळी झालेल्या कारवाईत तीन टेम्पो, दोन ट्रॅक्टर अशी पाच वाहने आणि सात ब्रास वाळू जप्त केली.
----
मागील आठवड्यात विविध दोन आणि शनिवारची एक अशा तीन कारवाया अलीकडच्या काळात खानापूर परिसरात केल्या आहेत. पहिल्या कारवाईत आठ, तर दुसऱ्या कारवाईत नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारच्या कारवाईतील आरोपी हे पहिल्या कारवाईतीलच आरोपी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- अंजली मरोड
तहसीलदार, अक्कलकोट
----
फोटो : २८ खानापूर
खानापूर येथील कारवाईत अवैध वाळू उपसा करणारी वाहने पकडल्यानंतर ती अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. यावेळी राणा वाघमारे, संजय सोनटक्के, सुभाष धर्मसाले