सोलापूर : दौंड व मनमाड विभागात दुहेरी मार्ग सुरू करण्यासाठी होत असलेल्या कामामुळे १८ ऑक्टोबर २०२२ रोजीपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ऐन सणासुदीत रेल्वेची प्रवासी सेवा कोलमडल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
याशिवाय यशवंतपूर -अहमदाबाद एक्स्प्रेस ही व्हाया दौंड-पुणे-लोणावळा-वसई रोड-सूरत मार्गे धावेल. चेन्नई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया रायचूर - विकाराबाद-बिदर -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. म्हैसूर- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डूवाडी -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. पुणे -लखनऊ एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -हावडा एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी-मनमाड मार्गे धावेल. कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे - बनारस एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -गोरखपूर एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल-इगतपुरी –मनमाड मार्गे धावेल. गोरखपूर- पुणे एक्स्प्रेस ही व्हाया मनमाड- इगतपुरी-पनवेल - लोणावळा मार्गे धावणार आहे.
-------------
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
- - कोल्हापूर – गोंदिया एक्स्प्रेस
- - गोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेस
- - दादर -साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
- - साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस
- - पुणे - भुसावळ विशेष एक्स्प्रेस
- - भुसावळ- पुणे विशेष एक्स्प्रेस
- - पुणे - जबलपूर विशेष एक्स्प्रेस
- - जबलपूर- पुणे विशेष एक्स्प्रेस
- - पुणे - वीरांगना लक्ष्मीबाई विशेष एक्स्प्रेस
- - वीरांगना लक्ष्मीबाई- पुणे विशेष एक्स्प्रेस
- - पुणे - राणी कामलापती एक्स्प्रेस
- - राणी कामलापती - पुणे एक्स्प्रेस
- - पुणे- नागपूर एक्स्प्रेस
- - नागपूर- पुणे एक्स्प्रेस
- - पुणे - बिलासपूर एक्स्प्रेस
- - बिलासपूर - पुणे एक्स्प्रेस
- - पुणे - नांदेड एक्स्प्रेस
- - नांदेड- पुणे एक्स्प्रेस
- - पुणे- काजीपेठ एक्स्प्रेस
- - काजीपेठ- पुणे एक्स्प्रेस
------------