शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार !

By appasaheb.patil | Published: November 12, 2019 10:47 AM

मध्य रेल्वे : सोलापूर स्थानकावर १४ व्हीलचेअरसह १, २, ३ प्लॅटफॉर्मवर लिफ्ट कार्यान्वित

ठळक मुद्देसोलापूर विभागातील सर्वच स्थानकावर दिव्यांगासाठीच्या सर्व सेवासुविधा पुरविण्यात आलेल्या आहेतयेत्या दोन ते तीन महिन्यांत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरही दिव्यांगांसाठी लिफ्ट बसविण्यात येणारमध्य रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा देण्यात तत्पर

सोलापूर : वृद्ध व अपंग प्रवाशांना रेल्वे गाड्यांच्या कोचमध्ये सहज जाता यावे, यासाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर स्थानकावर लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे़ याशिवाय येत्या दोन ते तीन महिन्यांत प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरही दिव्यांगांसाठी लिफ्ट बसविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

दरम्यान, वृद्ध, अपंग व आजारी प्रवाशांना अनेकदा गाडीत चढता येत नाही. त्यांना अक्षरश: उचलून न्यावे लागते. व्हीलचेअरने ते कोचपर्यंत येऊ शकतात, मात्र व्हीलचेअर कोचमध्ये नेण्याची सोय आतापर्यंत नाही. नागपूर विभागाच्या सहकार्याने व सोलापूर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा सोलापूर विभागातील सर्वच स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही हिरडे यांनी दिली.मध्य रेल्वे स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा देण्यात तत्पर आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ व ३ वर लिफ्ट बसविण्यात आले असून आगामी काही महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वरही लिफ्टची सुविधा करण्यात येणार आहे़ याशिवाय प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ व ३ वर एस्केलेटरची व्यवस्था आहे. कोणत्याही दिव्यांग प्रवाशाला स्थानकात प्रवेश करतेवेळी अडचण येऊ नये यासाठी स्थानकासमोरील इमारतीजवळ दोन्ही बाजूस रॅम्प उभा करण्यात आला आहे़ दिव्यांग प्रवाशांसाठी स्थानकावर १४ व्हीलचेअर मोफत वापरण्यासाठी आहेत़ दिव्यांगांसाठी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे नळ, वाहन ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था, व्हीलचेअरला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर येण्या-जाण्याकरिता पाथवेची व्यवस्था करण्यात आली आहे.

चौकशी कक्षातील सुविधांचे काय ?- रेल्वेस्थानकात कर्णबधिर, मुके (बोलता न येणारे दिव्यांग) यासाठी आवश्यक त्या सूचना अथवा हस्तभाषा अवगत येणारे दुभाषी अथवा चौकशी कक्षात सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. मात्र, अशा सुविधा सोलापूर विभागातील कोणत्याच रेल्वे स्थानकावर नसल्याने अशा दिव्यांगांची गैरसोय होत आहे़ याही सुविधांकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी अपंग संघटनेने केली आहे़

सोलापूर विभागातील सर्वच स्थानकावर दिव्यांगासाठीच्या सर्व सेवासुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत़ लवकरच नागपूर विभागाच्या इतवारी स्थानकावर करण्यात आलेल्या पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पसारखी सुविधा सोलापूर विभागातील प्रत्येक स्थानकावर करण्याचा आमचा मानस आहे़ त्यादृष्टीने योग्य ती पाऊले उचलणार आहोत़ शिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५ वर लवकरच दिव्यांगासाठी लिफ्टची उभारणी करणार आहोत़- प्रदीप हिरडे,वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग़

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूर