अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे ऑपरेशन ग्रीन सुरू केल्याने किसान रेल्वेतून माल पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्के सवलत मिळेल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले. सांगोला रेल्वेस्थानकातून २१ ऑगस्ट रोजी पहिली किसान रेल्वे डाळिंब भरून धावली होती.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगोला रेल्वेस्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार याठिकाणी किसान रेल्वे सुरू केल्या आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत १६ हजार ९७३ टन मालाच्या वाहतुकीतून रेल्वेला आठ कोटी तीन लाख ४१ हजार ९८८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
----
वाहतूक झालेला शेतीमाल व मिळालेलं उत्पन्न
ऑगस्टमध्ये २११ क्विंटल शेतमाल वाहतूक (नऊ लाख ६८ हजार ७१९ रुपयांचे उत्पन्न), सप्टेंबरमध्ये १२ हजार १३८ क्विंटल वाहतूक (५५ लाख ९४ हजार ९७ रुपयांचे उत्पन्न), ऑक्टोबरमध्ये ३३ हजार २५१ क्विंटल वाहतूक (एक कोटी ५४ लाख ८१ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न), नोव्हेंबरमध्ये २७ हजार ३०२ क्विंटल वाहतूक (एक कोटी २६ लाख ८८ हजार ७० रुपयांचे उत्पन्न), डिसेंबरमध्ये २१ हजार १०५ क्विंटल वाहतूक (९९ लाख ९२ हजार ४१२ रुपयांचे उत्पन्न), जानेवारीमध्ये २१ हजार २५९ क्विंटल वाहतूक (एक कोटी सहा लाख ९३ हजार ४२० रुपयांचे उत्पन्न), फेब्रुवारीमध्ये ५२ हजार ५७४ क्विंटल वाहतूक (दाेन कोटी ४९ लाख २७ हजार ७७५ रुपयांचे उत्पन्न) असे एकूण आतापर्यंत एक लाख ६९ हजार ७३९ क्विंटल शेतीमाल वाहतुकीतून आठ कोटी तीन लाख ४१ हजार ९८८ रुपयांचे उत्पन्न रेल्वेला मिळाल्याचे रेल्वेचे सिंग यांनी सांगितले.