सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून धावणाºया एक्स्प्रेस किंवा पॅसेंजर गाड्यांमध्ये तिकीट तपासनिसाला चुकवून तिकीट न काढताच प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. या फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात घट होत असल्याने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने तिकीट तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत विनातिकीट प्रवास करणाºया २८ हजार ८५९ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १ कोटी ५१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोलापूर विभागामध्ये २१ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१९ या दरम्यान दिवाळी सणानिमित्त रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गाड्यांमध्ये प्रवासी विनातिकीट प्रवास करू नये, याकरिता विशेष तिकीट तपासणी मोहिमेचे आयोजन केले आहे़ या तपासणीत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ७७ रेल्वे स्थानकांवरून धावणाºया मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांकडील तिकिटाची तपासणी केली़ या तपासणीत २८ हजार ८५९ प्रवाशांकडे तिकीट नसल्याची माहिती समोर आली़ त्यानुसार त्यांच्याकडून १ कोटी ५१ लाख ८७ हजार ५२५ रुपयांचा दंड वसूल केला़ ही कारवाई विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्या नेतृत्वाखाली, तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.
यंदा १२.२१ टक्के अधिक दंड वसूल- दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढली आहे़ मागील वर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईत २५ हजार ४९२ प्रवाशांकडून १ कोटी ३५ लाख ३५ हजार १३४ रुपयांचा दंड वसूल केला होता़ गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी १२.२१ टक्के अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली.
धूम्रपान करणाºया ४९८ प्रवाशांवर झाली कारवाई- मागील काही महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सर्वच रेल्वे स्थानकांवर धूम्रपान करणाºया प्रवाशांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे़ त्यानुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात धावणाºया रेल्वे गाड्यांमध्ये तसेच स्थानकावर धूम्रपान व अस्वच्छता करणाºया ४९८ प्रवाशांवर रेल्वेच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाईतून रेल्वेला १ लाख ११ हजार २०० रुपयांचे उत्पन्न मिळाले़ यासाठी रेल्वेचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते.दंड न भरल्यास तुरुंगात रवानगीफुकट्या प्रवाशांबरोबरच योग्य श्रेणीचे तिकीट न घेणे, त्याचप्रमाणे निश्चित वजनापेक्षा जास्त वजनाच्या साहित्याची वाहतूक करणाºयांवर रेल्वेकडून कारवाई केली जात आहे. विनातिकीट प्रवास करताना पकडल्यास रेल्वेच्या तिकिटाच्या रकमेसह २५० रुपयांचा दंड केला जातो. योग्य श्रेणीचे तिकीट नसल्यास संबंधित श्रेणीचा तिकीट दर किंवा तितकाच दंड आकारला जातो. निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचे साहित्य घेऊन प्रवास करताना पकडल्यास सहापटीने दंडाची आकारणी केली जाते. दंड न भरल्यास संबंधिताची रवानगी कारागृहात करण्याची तरतूदही रेल्वेच्या कायद्यात आहे.
मागील काही महिन्यांपासून रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाºयांची संख्या वाढली होती़ याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दिवाळी सणात होणाºया गर्दीचा फायदा घेऊन फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे नियोजन केले होते़ त्यानुसार कारवाई करण्यात आली़ ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार आहे़ तरी प्रवाशांनी नियमानुसार तिकीट काढूनच रेल्वेने प्रवास करून रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.- प्रदीप हिरडेवरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे सोलापूर विभाग