काशिनाथ वाघमारे
सोलापूर : केरळच्या पूरग्रस्तांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून गेल्या पंधरा दिवसात ९.२६ टनाची औषधे, कपडे, अन्न अशा जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली असून, राज्यातील पाच विभागातून आजवर ८४९.२३ टनाचे साहित्य पाठविण्यात आले आहे. दातृत्त्वात मात्र भुसावळ विभागाने पहिला क्रमांक पटकाविला आहे.
केरळमध्ये पुरात लाखो घरे वाहून गेली़ असंख्य लोकांचा मृत्यू झाला़ जनजीवन विस्कळीत झाले़ त्यानंतर तिकडे मदतीचा ओघ सुरु झाला़ ही मदत वेळेत पोहोचावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वेच्या माध्यमातून पोहोचवली गेली़ मानवतेच्या दृष्टिकोनातून रेल्वेनेदेखील अन्न, औषध, कापड आणि पाणी या साºया मदतीची वाहतूक ही मोफत करण्याचे जाहीर केले़ १८ आॅगस्टपासून ही मोफत वाहतूक सुरु झाली़ ५ सप्टेंबरपर्यंत मध्य रेल्वे विभागातून ८४९़२३ टन साहित्यांची मदत रेल्वे वाहतुकीतून पोहोचली़ पुण्यातून १४ वॅगन पाणी पोहोचवले गेले़ याबरोबरच सोलापूरमधून २१ आॅगस्ट रोजी एनटीपीसी (फताटेवाडी, दक्षिण सोलापूर)कडून काही साहित्य रवाना झाले़ जीवनावश्यक साहित्य पुरवण्यात मुंबई शहर मात्र दुसºया क्रमांकावर ठरले़ सोलापूर शहरातून विविध संघटनाही वस्तू आणि पैशांच्या स्वरुपात मदत गोळा करुन पाठवत आहेत़
सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांचा पगार... - महाराष्ट्रातून विविध विभागातून केरळवासीयांना रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार देऊन मानवता धर्म जोपासला आहे़ मध्य रेल्वे अर्थात मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागातील सर्व रेल्वे कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार त्यांना दिला आहे़ संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व रेल्वे अधिकारी, कर्मचाºयांकडून ६ कोटी ६२ लाख ४७ हजार २५० रुपयांची आर्थिक मदत केरळला पोहोचली आहे़ यामध्ये सोलापूर विभागातून ९,६०० कर्मचाºयांनी एक दिवसाचा पगार देऊ केला आहे़
विभागनिहाय मदत़...- मुंबई - ३१७ टन- पुणे - १३१़३० टन - भुसावळ - ३५१़८८ टन - नागपूर - ३९़४४ टन- सोलापूर - ९़२६ टन
मध्य रेल्वेने केरळपर्यंत मालवाहतूक मोफत दिली़ मानवतेच्या दृष्टिकोनातून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे़ महाराष्ट्रातील पाचही विभागातून मदत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला़- डी़ के. शर्मामहाव्यवस्थापक, मध्य रेल्वे