सोलापूर: फेब्रुवारीपासून सतत वादळ, गारा व विजा पडल्याने जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील वर्षी ३० व ३१ मे रोजी उत्तर, दक्षिण सोलापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला होता. सलग दोन वर्षे सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. सोलापूर जिल्ह्याची पाणी पातळी खोलवर गेली होती. निरीक्षण विहिरींची पाण्याची पातळी एवढ्या खोलवर जाण्याची पहिलीच वेळ असल्याचे वरिष्ठ भू वैज्ञानिक कार्यालयाने सांगितले होते; मात्र मागील वर्षी मे महिन्यातच पावसाचे वातावरण तयार झाले होते. ३० व ३१ मे रोजी सोलापूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. ३० मे रोजी एकूण २३.४ तर ३१ मे रोजी ७३.८ मि.मी. पाऊस पडला होता. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ तालुक्यात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाचे वातावरण तसेच राहिले व सतत पाऊस पडत राहिला. पाऊस धो-धो पडला नसला तरी खरीप व रब्बी पिके चांगली येण्यासाठी उपयुक्त होता. याचा फायदा नक्कीच झाला होता. उजनी धरणाची पाणी पातळी वजा ५० झाली होती. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात उजनी धरण परिसर व पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु झाल्याने उजनीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली होती. सततच्या पावसाने एकंदरीत चांगले चित्र निर्माण झाले होते
. --------------------
जूनमध्ये वादळी पाऊस
यावर्षी २६ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान सोलापूर जिल्ह्यात गारपीट, वादळ व विजांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कालावधीत ७ नागरिकांचा वीज पडल्याने मृत्यू झाला होता. जनावरे मोठ्या प्रमाणावर दगावली, घरांची मोठी पडझड झाली व पिकांची हानीही झाली होती. त्यानंतरही अधूनमधून वादळ, विजा पडणे व गारपीट सुरूच आहे. मान्सून तोंडावर आला असतानाही वादळी पावसाचे थैमान थांबले नाही. याउलट जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे.