सोलापूर : उजनीच्या कार्यक्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यातील मागील आठ ते दहा दिवसात पावसाचा एकही थेंब पडला नाही. गेल्या आठ दिवसात पाऊस नाही याचा परिणाम उजनीकडे येणार्या दौड विसर्गावर झाला आहे. उजनी पाणीपातळी गेल्या ४८ तासापासून १३.२२ टक्केच्या आसपास थांबली आहे. उजनीकडे येणारा दौड विसर्ग सोमवारी दुपारी ७२१ क्युसेकपर्यंत खाली आला आहे. १५ तारखेनंतर पाऊस येईल या आशेवर आता उजनीचा पुढील प्रवास अवलंबून असणार आहे. मागील दहा दिवसांपासून सोलापूर शहरातील तापमानात वाढ झाली असून उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सात दिवसात पावसाचा एक थेंबही सोलापुरात पडला नाही. हवेतील आर्द्रता वाढल्याने घामाघूम झालेले नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत.दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. जुलै महिन्यात पावसाने काही दिवस हजेरी लावली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील विविध भागात पडला. त्या काळात तापमानाचा पारा २२ अंशापर्यंत खाली उतरला होता, मात्र ५ ऑगस्टनंतर तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मागील १३ दिवसात सहा अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाऊस थांबला; उजनी धरणातील पाणीपातळी स्थिर
By appasaheb.patil | Published: August 14, 2023 2:32 PM