शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पाच तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:25 AM

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस ...

सोलापूर : जिल्ह्यातील पाच तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर चार तालुक्यांत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. करमाळा व माळशिरस तालुक्यांत सरासरीच्या ८५ टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९९.९ टक्के इतका पाऊस झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात ४८१.१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. शनिवार दिनांक २५ सप्टेंबरपर्यंत ४८०.६ मि.मी. म्हणजे ९९.९ टक्के इतका पाऊस पडला आहे. मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा या तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. मोहोळ तालुक्यात पावसाळ्याच्या चार महिन्यांत ४५७.४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ५२७ मि.मी. इतका ११५.३ टक्के, उत्तर तालुक्यात ५५२ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ६१० मि.मी. ११०.५ टक्के, बार्शी तालुक्यात ५२८ मि.मी. अपेक्षित असताना ५८३ मि.मी. ११०.४ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ५३६ मि.मी. अपेक्षित असताना ५५६ मि. मी. म्हणजे १०३.७ टक्के तर मंगळवेढा तालुक्यात ४३४ मि.मी. अपेक्षित असताना ४३९ मि. मी. म्हणजे १०१ टक्के इतका पाऊस पडला आहे.

अक्कलकोट तालुक्यात ९७.९ टक्के, सांगोला तालुक्यात ९६.६ टक्के, पंढरपूर तालुक्यात ९३.७ टक्के, तर माढा तालुक्यात ९३.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. माळशिरस व करमाळा तालुक्यांत मात्र आतापर्यंत ८५ टक्के इतकाच पाऊस पडला आहे.

---

जिल्य्यातील दोन बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव तर १५ लघु होटगी, बोरगाव, शिरवळवाडी, भुरीकवठे, कोरेगाव, गोरमाळे, वालवड, काटेगाव, जवळा, घेरडी, हंगीरगे, ममदापूर, शेळगाव, चारे, कळंबवाडी, जवळगाव हे तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. गळोरगी, डोंबरजवळगे, काझीकणबस, पाथरी, कारी, तावडी, वैराग व घोळसगाव या तलावात ६४ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी साठा झाला आहे. रामपूर २५ टक्के, तर बीबीदारफळ तलावात ३२ टक्के पाणी साठा झाला आहे.

---

उजनी जलाशयानंतर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी साठवण क्षमता असलेल्या एकरुख मध्यम प्रकल्पात ६७.३५ टक्के (१.४५ टी.एम.सी.) पाणी आले आहे. हिंगणी ७५.४५ टक्के, जवळगाव ७७.४६ टक्के, मांगी १३.९७ टक्के, आष्टी ५७.३७ टक्के तर बोरी व पिंपळगाव ढाळे हे मध्यम तलाव पूर्ण भरले आहेत.

---

0आठ मध्यम तलावाची १३४.४५ द.ल.घ.मी. इतकी पाणी साठवण क्षमता आहे. प्रत्यक्षात ६७.७० द.ल.घ.मी. म्हणजे ४.७५ टी.एम.सी. पाणी साठा झाला आहे.

0 ५६ लघु तलावात ५६.२६ दलघमी म्हणजे ४१.१५ टक्के पाणी साठा झाला आहे.

-----

फोटो- तलाव भरलेला ...