याशिवाय करमाळा तालुक्यात भालेवाडी, धायखिंडी, करंजे या गावात सायंकाळी चार वाजता पावसाच्या सरी कोसळल्या आणि मातीचा सुगंध दरवळला. पंढरपूर शहरात साडेसात वाजेच्या दरम्यान पावसाचा सडा पडला. यामुळे जमिनीतून वाफ बाहेर पडली. हवेत गारवा निर्माण झाला. माळशिरस तालुक्यात पुरंदवडे, भांबुर्डी येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मंगळवेढ्यात मात्र सायंकाळी ६.३० वाजता रिमझिम पाऊस झाला.
---
सांगोल्यात विजांच्या कडकडाटासह सरी बरसल्या
सांगोला तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, रात्री ८.३० नंतर सांगोला शहर आणि कोळा, महूद, जुनोनी, तिप्पेहळ्ळी, वाढेगाव, कडलास या गावांमध्ये वादळी-वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तसेच विजांचा कडकडाट बराच वेळ होत राहिला.
----
बीबीदारफळ, बेलाटी परिसरात केवळ विजा चमकल्या
उत्तर सोलापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी वादळी वारे वाहिले. मात्र, पाऊस झाला नाही. रात्री साडेआठ वाजता विजांचा कडकडाट झाला. हिच स्थिती कळमण, मोहोळ तालुक्यातील वाळूज, नरखेड, हिंगणी परिसरात पाहायला मिळाली. मात्र, दक्षिण सोलापूर तालुक्यात दिवसभर उकाडा जाणवला.