शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

आमदार चषकवर पुन्हा राज भोसरे संघाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:39 AM

कुर्डूवाडी : आमदार मामासाहेब क्रिकेट चषक २०२१ च्या क्रिकेट स्पर्धेत यंदाही पुन्हा एकदा राज भोसरे संघाने करमाळा येथील ...

कुर्डूवाडी : आमदार मामासाहेब क्रिकेट चषक २०२१ च्या क्रिकेट स्पर्धेत यंदाही पुन्हा एकदा राज भोसरे संघाने करमाळा येथील शिवक्रांती क्रिकेट संघावर सहज मात करीत या चषकावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

भोसरे (कुर्डूवाडी) येथे राज भोसरे क्रिकेट क्लब, भोसरे आयोजित आमदार मामासाहेब चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भोसरे येथील राज भोसरे संघाने अंतिम सामन्यामध्ये बाजी मारली व चषक जिंकला. याचे बक्षीस वितरण आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रथम पारितोषिक राज क्रिकेट क्लब भोसरे, द्वितीय पारितोषिक शिवक्रांती क्रिकेट क्लब, करमाळा, तृतीय पारितोषिक रिधोरे क्रिकेट क्लब व चतुर्थ पारितोषिक रोख अकरा हजार रुपये टेभुर्णी संघाला देण्यात आले. या चषकात एकूण ४० संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते.

या समारंभास आ. संजयमामा शिंदे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, विठ्ठल ॅकार्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, अमोल सुरवसे, हरिदास बागल, आप्पा उबाळे, ता. पं. सदस्य सुरेश बागल, नगरसेवक आनंद टोणपे, संभाजी सातव, कुस्ती सम्राट अस्लम काझी, शिवसेनेचे युवा नेते सचिन बागल, चौभेपिंपरीचे सरपंच विक्रम उरमोडे, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, बारलोणीचे सरपंच संजय लोंढे, चिंचगावचे सरपंच सुभाष उबाळे, ज्येष्ठ नेते वामनराव बागल, अनंतराव बागल, सुधीर बागल, शहाजी पाटील, आदी उपस्थित होते.

सामने यशस्वी करण्यासाठी राज भोसरे संघातील सर्व खेळाडू व संभाजी बागल, बबलू बागल, अमित टोणपे, प्रणित शिंदे, पंडित खारे ,राहुल अंधारे, चिंटू पाटील, दादा चव्हाण, हेमंत पिसाळ, समाधान बागल यांनी सहकार्य करीत परिश्रम घेतले. सामन्याचे आयोजन हर्षल बागल व संजय चव्हाण यांनी केले होते.

फोटो ओळ-

भोसरे येथे आमदार मामासाहेब क्रिकेट चषक २०२१ च्या क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेला राज भोसरे संघाला पारितोषिक वितरण करताना आमदार संजयमामा शिंदे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, वामनभाऊ उबाळे, आप्पासाहेब उबाळे, यशवंत शिंदे, अमोल सुरवसे, आदी मान्यवर.

----