रंजना आवटे
सोलापूर : प्रा. रंजना सिद्रामप्पा आवटे (५८, रा.कोणार्कनगर, विजापूर रोड) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
इलाई मुलाणी
पंढरपूर : इलाई जमाल मुलाणी (७२, रा.पुळूज, ता.पंढरपूर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पुळूज येथील शिवसेना विभाग प्रमुख युन्नूस मुलाणी यांचे ते वडील होत.
पार्श्वनाथ तालीकोटी
सोलापूर : सेवानिवृत्त मेजर पार्श्वनाथ भरणप्पा तालिकोटी (८८, रा. सोलापूर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यापश्चात तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. आचार्य शांतीसागर युवा संघटनेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांचे वडिल होत.
वसुंधरा कुलकर्णी
सोलापूर : वसुंधरा प्रभाकर कुलकर्णी (७६, रा.जुळे सोलापूर) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यापश्चात विमा गुंतवणूक सल्लागार अजय कुलकर्णी, आरोग्य सहायक सचिन कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.