सोलापूर : पोलीस आयुक्तपदी राजेंद्र माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी गृह विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या बदलीच्या आदेशामध्ये त्यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. राजेंद्र माने यांनी यापूर्वी २००९ ते २०१२ या कालावधीत पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले होते.
गृह विभागाने निवडसूची २०२२ अनुसार पोलीस उप महानिरीक्षक दर्जाच्या अधिऱ्यांच्या बदल्या झाल्याचा आदेश काढला आहे. राजेंद्र माने हे सध्या राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे कार्यरत आहेत. बुधवारी काढण्यात ओलल्या आदेशामध्ये राजेंद्र माने सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली केल्याचे नमूद केले आहे. राजेंद्र माने हे २००९ ते २०१२ या तीन वर्षात सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या कार्यकाळात त्यांनी एक वर्ष तर त्यानंतरचे पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांच्या कार्यकाळात दोन वर्ष पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना सोलापूरची संपूर्ण माहिती आहे.
१९९५ मध्ये पोलीस खात्यात दाखल
नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी यूपीएससी परीक्षेतून १९९५ साली डीवायएसपी म्हणून पोलीस खात्यात रुजू झाले होते. वर्धा, गडचिरोली, औरंगाबाद ग्रामीण, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, लातूर अन सध्या राज्य गुप्तवार्ता मुंबईचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. आता ते सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेत आहेत.
घरी येत असल्यासारखे वाटत आहे : राजेंद्र माने
सोलापुरात मी दोन पोलीस आयुक्तांच्या हाताखाली तीन वर्ष पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं आहे. सोलापूरची संपूर्ण माहिती मला आहे. सोलापूर बदली झाल्याचे समजल्यानंतर मला आनंद झाला. मला माझ्या घरी येत असल्यासारखे वाटत आहे. चार दिवसात मी पदभार घेईन, अशी प्रतिक्रिया नूतन पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
(फोटो रेवणअप्पा यांच्या मेलवर पाठवला आहे....)