पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात बिबट्याच्या शिकारीचे सत्र सुरूच आहे. सोमवारी पहाटे जैनवाडी परिसरात बिबट्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांनी राजस्थान येथून आणलेल्या काळी कपिला जातीच्या महागड्या गायीवर हल्ला चढवून तिचा फडशा पाडला़ या घटनेने पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे.
वाखरी, भाळवणी, पिराची कुरोली व वाडीकुरोली या परिसरातील शेळ्या, कुत्रे व अन्य प्राण्यांची शिकार बिबट्याने केली आहे. सोमवारी पहाटे बिबट्याने जैनवाडी येथे गाईची शिकार केली आहे. ही गाई भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांनी ३ वर्षा पूर्वी राजस्थान येथून एक लाख रुपये किंमतीला विकत आणली होती. या गाई चे दूध अत्यंत पोषक असल्याचे समजले जाते़ ते दूध पिल्यानंतर मानवाला अनेक रोगांची लागण होत नाही.
आता गाई चे वय तीन वर्ष होते. त्यामुळे तिची किंमत देखील वाढली होती. मात्र सोमवारी पहाटे बिबट्याने त्या गाईची शिकार केली. त्याठिकाणी वन विभागाच्या अधिका?्नी भेट दिली. त्याच रात्री ८ वाजता जैनवाडी येथील सुरपुसे वस्ती येथे कुमार हिरालाल उमडाळे यांनी बिबट्याची दोन पिलांना पाहीले आहे. यामुळे जैन वाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.