कोल्हापूर, चांदोली अभयारण्यातून भरकटलेला जंगली रानगवा सोमवारी सायंकाळी सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे आढळला. ग्रामस्थांनी त्याला हुसकावून लावताना त्याने धुडगूस घालत मिरज हायवे पास करून गोडसेवाडीमार्गे वासुद परिसरात पलायन केले. दोन दिवसांपासून तो वासूद, कडलास परिसरातच पिकात लपून बसला आहे.
वन विभागापुढे आव्हान
दरम्यान, येथील महेश लेंडवे यास सकाळी तो दृष्टीस पडला. मात्र, पुन्हा गायब झाला. सांगोला येथील वन विभागाचे अधिकारी त्याला पुढे जाऊ न देता हुसकावून माघारी चांदोली अभयारण्यात परतविण्यासाठी पाळतीवर आहेत. मात्र, काही केल्या तो पिकातून बाहेर येण्यास तयार नसल्याने वन विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत या जंगली रानगव्याने कोणाला त्रास दिला नसला तरी ग्रामस्थांच्या मनात भीती कायम आहे.