लाखो स्वामीभक्तांसह अक्कलकोट-सोलापूर या मार्गावरून दररोज व्यापारी, नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी, कामगारांसह अनेकजण प्रवास करतात. या मार्गावरून एसटी व परिवहनच्या सिटी बस सेवेला प्रतिसाद आहे. रंगभवन परिसरात काॅलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, न्यायालय, बँका, सरकारी व खासगी दवाखाने, आदी कार्यालये असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी सुविधा नाही. एसटी महामंडळाकडून स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. यात रंगभवन आणि पाण्याची टाकी या ठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा बनविण्याची मागणी केली आहे.
-----
गेल्या दहा वर्षांपासून अक्कलकोट-सोलापूर या मार्गावरून एसटीच्या माध्यमातून प्रवास करतो. रंगभवन आणि पाण्याची टाकी या थांब्यांवर थांबण्यासाठी कोणत्याच प्रकारची सुविधा नाही. रंगभवनवर स्मार्ट सिटीअंतर्गत मोठे प्लाझा बनविले आहे. मात्र, प्रवासी उन्हात, पावसात थांबतात. याची दखल घेऊन संबंधितांनी आवश्यक कार्यवाही करावी.
- महेश कुंभार, शिक्षक
-----
अक्कलकोटच्या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. रंगभवन आणि पाण्याच्या टाकी येथून बहुतांश लोकांचा प्रवास अवलंबून आहे. मात्र, या ठिकाणी स्टाॅपवर निवारा बांधण्यात यावा, यासाठी बैठकीत सूचना मांडली होती. अनेकवेळा पत्रव्यवहारदेखील केला आहे. पाण्याच्या टाकीजवळून रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. ही योग्य वेळ असून, त्याठिकाणी थांबण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी.
- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर विभाग
----
150921\483420210807_133233.jpg
रंगभवनच्या स्टाॅपवर गाडीच्या प्रतिक्षेत भर उन्हात थांबलेले प्रवासी...