माढा मतदारसंघासाठी रणजितदादाच; राष्टÑवादी की भाजपा, हे आज कळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:16 AM2019-03-19T06:16:18+5:302019-03-19T06:17:01+5:30

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आली तरी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार कोण? हे निश्चित झाले नसल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

 Ranjitdada for Madha constituency; The nation's plaintiff's BJP, will know today | माढा मतदारसंघासाठी रणजितदादाच; राष्टÑवादी की भाजपा, हे आज कळणार

माढा मतदारसंघासाठी रणजितदादाच; राष्टÑवादी की भाजपा, हे आज कळणार

Next

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आली तरी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार कोण? हे निश्चित झाले नसल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे, परंतु पक्ष राष्ट्रवादी की भाजपा हे उद्या मंगळवारी स्पष्ट केले जाईल, अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली़
सोमवारी मुंबई येथे मोहिते-पाटील परिवाराची बैठक झाली़ त्यानंतर येत्या २४ तासांत कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याचा उलगडा केला जाईल, असे सांगण्यात आले़ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे जाहीर केले, नंतर माघार घेतली़ त्यानंतर राष्ट्रवादीकडून पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली़ या दोन्ही यादीत विद्यमान खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव जाहीर न झाल्याने नाराज झालेले खा. मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आता कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा निर्धार केला आहे़ आता केवळ पक्ष कोणता याचीच उत्सुकता लागली आहे़
विजयसिंह मोहिते-पाटील यांनी ‘दोन दिवस थांबा, सारे काही स्पष्ट होईल’ असे सांगितले होते.
 

Web Title:  Ranjitdada for Madha constituency; The nation's plaintiff's BJP, will know today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.