शितलकुमार कांबळे
सोलापूर : जागतिक पातळीवरील वर्ष 2020 चा ‘ग्लोबल टिचर अॅवॉर्ड’ पटकाविलेले सोलापुरचे ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे. डिसले गुरुजींबाबत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एख समीती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे.
डिसले गुरुजी यांच्यावर ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना अधिकाऱ्यांची परवानगी न घेणे, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे नियुक्ती असताना गैरहजर राहणे आदी आरोप आहेत. या वादात डिसले गुरुजी सापडल्यानंतर चौकशी समीती नेमली होती. समीतीने चौकशी अहवाल तयार करुन सीईओकडे पाठविला आहे. या अहवालाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे. अहवालात काही त्रुटी आहे का हे तपासण्यात येणार आहे. हा अहवाल अद्याप आला नसताना डिसले गुरुजींनी राजीनामा दिला आहे.
ते कार्यमुक्त होतील
रणजीतसिंह डिसले यांनी आठ जुलै रोजी राजीनामा दिला आहे. माझ्यासमोर मंगळवार 12 जुलै रोजी राजीनाम्याचे पत्र आले. त्यांना एक महिन्याचा सूचना कालावधी देण्यात आला आहे. आठ ऑगस्टनंतर ते कार्यमुक्त होतील.- किरण लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद