कुर्डूवाडी : भावकीत भांडणात तुटून पडलेले मंगळसूत्र शोधत असताना एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पंडित डिकोळे याच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१८ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता स्वतःच्या शेतामध्ये काही कारणावरुन पीडित महिला आणि डिकोळे परिवारातील सहाजण यांच्यात वाद झाला. या वादविवादाचे पर्यवसान जबर मारहाणीत झाले. या घटनेदरम्यान पीडित महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तिथे पडले होते. याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेतात पडलेले मंगळसूत्र शोधण्यासाठी १९ मार्च रोजी सकाळी सात वाजता शेतात पीडित महिला गेली असता पाठीमागून आरोपी पंडित डिकोळे आणि तिला लज्जा वाटेल असे वर्तन केले. याप्रकरणी डिकोळे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.