सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार वेगाने होत आहे. ग्रामीण भागात दररोज पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहेत. सध्या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग व्यवसाय कडकडीत बंद आहेत. अशा परिस्थितीत सांगोला शहरात नागरिक दुचाकीवर विनाकारण तोंडाला मास्क न लावता मोकाट फिरत आहेत. प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी २१ मे ते १ जून या कालावधीत शहर व ग्रामीण भागात कडक लाॅकडाऊन जाहीर करून दुचाकीवर मोकाट फिरणाऱ्या व मास्क न लावणाऱ्या नागरिकांंवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस स्टेशन सांगोला नगरपरिषद व सांगोला तहसील कार्यालय यांच्या संयुक्तपणे तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत सांगोला शहरातील वंदे मातरम् चौक, वाढेगाव चौक, वासूद चौक, कडलास रोड, जय भवानी चौक येथे पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
कोट :::::::::::::
लॉकडाऊनच्या काळात कडक निर्बंध असताना घरात बसा, विनाकारण बाहेर फिरू नका, तोंडाला मास्कचा वापर करा. तरच आपण कोरोनाला हरवू शकणार आहोत. अन्यथा विनाकारण फिरताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई व कोरोना टेस्ट केली जाईल.
- सुहास जगताप
पोलीस निरीक्षक
फोटो ओळ :::::::::::::::
सांगोला पोलीस, नगरपालिका व महसूल प्रशासनाकडून सांगोला शहरात दुचाकीवर विनाकारण मास्क न लावता मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची रॅपिड ॲंटिजन टेस्टसाठी रांगेचे छायाचित्र.