शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

उजनीत आढळले दुर्मीळ सोनेरी कासव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 6:20 AM

जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर  तालुक्‍यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे.

करमाळा (जि. सोलापूर) :  उजनीचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्‍याच्या सरहद्दीवरील कोंढार - चिंचोली व डिकसळ (ता. इंदापूर)  हद्दीत मासेमारी करणाऱ्या दांपत्यास दुर्मीळ सोनेरी कासव सापडले. जागतिक पातळीवर होणाऱ्या तस्करी प्रकारात या कासवाचा प्रथम क्रमांक लागतो.  जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर  तालुक्‍यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे. सामान्य कासवांपेक्षा इंडियन स्टार कासव सुंदर, असामान्य व मनमोहक आहे. त्याच्या बाह्य कवचावर ताऱ्यांप्रमाणे दिसणारे मनमोहक सोनेरी रंगाचे सप्तर्षी ठिपके आहेत. कासवांच्या प्रजातीमध्ये इंडियन स्टार जातीच्या कासवाचा जगात तिसरा क्रमांक लागतो.प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटात तसेच पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका या देशांत ड्राय झोन भागात हे कासव आढळते. भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल येथे असे कासव आढळून आल्याच्या नोंदी आहेत. फेंगशुई, जादूटोणा, औषध निर्मितीसाठी या कासवांची तस्करी जागतिक पातळीवर चालते.  सोनेरी पहाट पण... विनोद अभिलाल काळे व त्यांची पत्नी शिवानी हे दोघे नेहमीप्रमाणे उजनी पाणलोट क्षेत्रात डिकसळ भागात पहाटे मासेमारीसाठी गेले होते. या वेळी उगवत्या सूर्य किरणांमध्ये त्यांना चमकणारी वस्तू दिसली.  त्यामुळे मोठ्या कुतूहलाने जवळ जाताच त्यांनी आजपर्यंत कधीच पाहिले नसलेले कासव दिसले. त्यांना हे कासव दुर्मीळ असल्याची जाणीव झाली. वास्तविक, तस्करीचा विचार मनात आला असता तर ही पहाट त्यांना सोनेरी ठरली असती. मात्र, तसे न करता त्यांनी हे  कासव वनविभागाच्या ताब्यात दिले.  

पाठीवर नक्षत्रांचा आलेख असलेले नजाकतदार कासव आशिया खंडातील भारतीय उपखंडातच आढळते. या कासवांचा वावर पाकिस्तानात सिंध प्रांत, पश्‍चिमेकडे बंगाल प्रांतापर्यंत व दक्षिणेत श्रीलंकापर्यंत तुरळकपणे पाहायला मिळतो. दुर्मीळ प्रजातीचे हे कासव उजनीच्या पोटात आढळल्याने धरण पाणलोट क्षेत्रात जैवविविधता असल्याचे स्पष्ट होते.    - प्रा. डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ प्राणीशास्त्रज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूर