स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी. सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिकामधील ओबीसीसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. ओबीसींच्या हक्काच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे. या मागण्यांसाठी समता परिषद मोहोळ तालुकाच्या वतीने कन्या प्रशाला शाळेसमोर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भंडारे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे , जिल्हा कार्याध्यक्ष अनिल अभंगराव, जिल्हा शहराध्यक्ष शशी कांबळे, तालुकाध्यक्ष अमोल माळी, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी, रफिक आतार, शिवाजी भानवसे, पंढरपूर तालुका अध्यक्ष चंद्रशेखर जाधव, पांडुरंग माळी, अवधूत माळी, अमोल ननवरे, पांडुरंग माळी, अतुल माळी, श्रीनिवास नामदे, पुंडलिक माळी, पांडुरंग येळवे, बजरंग शेंडेकर, सुरेश माळी, सुभाष ननवरे, पोपट वसेकर, बालाजी माळी, राजकुमार आढेगावकर, विठ्ठल कोळी आदी उपस्थित होते.
-----
फोटो २५ मोहोळ
मोहोळ तेथील कन्या प्रशाला चौकात सोलापूर-पुणे राष्ट्रीय रस्ता रोको करताना आंदोलक.