मिरगव्हाण येथील आप्पा वायसे यांच्या घरात सकाळी पूजा केल्यानंतर देव्हाऱ्यात असलेल्या दिव्याची वात उंदराने पळवली आणि घराला आग लागली. तेव्हा आप्पा वायसे, त्यांची पत्नी, वडील आणि दोन मुले घरात होती. एका कोपऱ्याला घर पेटल्याचे शेजारच्या लोकांनी पाहिले आणि त्यांनी घर पेटल्याचे सांगितले. आग लागल्याचे समजताच सर्वांनी घराबाहेर धाव घेतली.
दरम्यान, आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिक ती विझवण्यासाठी धावले, मात्र वेगाने सुटलेल्या वाऱ्यामुळे आग जास्तच भडकली. तसेच आप्पा वायसे यांच्या घराशेजारी राहत असलेल्या त्यांच्या भावाच्या घरालाही आग लागली. आगीने रुद्र रूप धारण केल्याने समोरील शेतातील दोन एकर उसानेही पेट घेतला. यात अंदाजे दोन लाखांचा ऊस जळून खाक झाला. या आगीत अप्पा वायसे यांचा मोठा मुलगा मयूर आणि लहान मुलगा महेश या दोघांच्या महत्त्वाच्या कागदपत्रासह जमीन व इतर महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी विकलेल्या उडदाचे अडीच लाख रुपयेही जळून गेले.
फोटो
२२ करमाळा आग०१
मिरगवव्हाण येथे घराला आग लागून राेख रकमेसह दोन एकर ऊस जळाला.