शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जय मार्कंडेयच्या जयघोषात सोलापुरात मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक जल्लोषात

By appasaheb.patil | Published: August 11, 2022 3:37 PM

मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डिजेचा दणदणाट; आकर्षक देखाव्यांनी वेधले लक्ष

सोलापूर : नूलू पुन्नम अर्थात नारळी पौर्णिमेला पदमशाली समाजाचे कुलदैवत महर्षी मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव मिरवणूक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे,गेले 2 वर्षे कोरोनामुळे रथोत्सव मिरवणूक निघाले नाही त्यामुळे यंदाच्या वर्षी समाजबांधवामध्ये रथोत्सवाबद्दल मोठा उत्साह होता, दरम्यान गुरुवारी नारळी पौर्णिमा निमित्ताने मार्कंडेय मंदिरात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती,  निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

दरम्यान, पहाटे ४ वाजता श्री गणेश पूजा, श्री रुद्र याग,नवग्रह पूजन, श्री चे रुद्राभिषेक मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले. सकाळी ६ वाजता पदमशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते पदमध्वजारोहण करण्यात आले. पदमशाली पुरोहित संघमच्या सहकार्याने यज्ञोपवीत धारण आणि रक्षाबंधन विधी पार पडले. यानिमित्ताने मंदिरातील मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीस सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आले होते. त्याचप्रमाणे मंदिरात आकर्षक लक्षवेधी फुलांची सजावट करण्यात आली होती.

सकाळी १० वाजता पालखी आणि उत्सव मूर्ती मंदिराबाहेर आणण्यात आली. उत्सव मूर्ती रथावर ठेवण्यात येऊन त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, आमदार प्राणिती शिंदे, माजी महापौर महेश कोठे, ऑल इंडिया पदमशाली संघमचे अध्यक्ष स्वामी कंदकटला, सचिव जगन्नाथ गडडम, पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, उपाध्यक्ष-अशोक इंदापुरे, सचिव संतोष सोमा, सहचिटणीस-अंबादास बिंगी, राजाराम गोसकी, जनार्दन कारमपुरी,-रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर आरकाल, नरसप्पा इप्पाकायल, रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, माजी महापौर श्रीकांचंना यन्नम, गणेश पेनगोंडा, पदमशाली युवक संघटना अध्यक्ष अमर एक्कलदेवी, कार्याध्यक्ष तुषार जक्का यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार विजयकुमार देशमुख आणि माजी आमदार आडम मास्तर यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. दरम्यान जय मार्कंडेय च्या जयघोषात ही मिरवणूक मार्गस्थ झाली. कन्ना चौक पदमवंशम संघटनेच्या वतीने  आणि माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल विजापूर वेस येथे भव्य रांगोळी साकारण्यात आली होती. यावेळी जय मार्कंडेय चा जयघोष करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मार्कंडेय रथावर पुष्पवृष्टी करण्यात येऊन हम सब एक है च्या घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पदमशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी अधिक माहिती दिली.आमदार प्राणिती शिंदे यांनी यावेळी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान मिरवणुकीत अग्रभागी दोन अश्व चोपदार आणि भालेदार होते,पालखीत शिवलिंग आणि बैलजोडीच्या रथावर उत्सव मूर्ती होती यावेळी दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तगणांनी गर्दी केली होती,या मिरवणुकीत श्री दत्तात्रय शक्ती लेझीम संघाच्यावतीने बहारदार लेझीमचा डाव सादर करण्यात आलं,तसेच विविध विवेकानंद शक्तिप्रयोग मंडळाने अंगावर शहारे आणणारे शक्तीप्रयोग सादर करून लक्ष वेधले.विविध डान्स ग्रुपने तेलुगू, हिंदी आणि मराठी गाण्यांवर आपली नृत्य कला सादर केली.मिरवणूक मार्गावर जय मार्कंडेयचा जयघोष करण्यात येत होता,हि मिरवणूक मार्कंडेय मंदिर येथून निघून भारतीय चौक,रत्नमारुती चौक,जमखंडी पूल,पदमशाली चौक,दत्त नगर,मार्कंडेय रुग्णालय,जोडबसवण्णा चौक,राजेंद्र चौक,बुलाभाई चौक,कन्ना चौक,उद्योग बँक,साखर पेठ,गुरुवार पेठ, समाचार चौक,माणिक चौक म,विजापूर वेस मार्गे मार्कंडेय मंदिर येथे उशिरा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Solapurसोलापूर