यावेळी ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेतील विद्यार्थिनी युविका कदम, अर्पिता मोरे यांना पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगीसं शिक्षक विजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. शंकरनगरन येथे लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत मुलींसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांतर्गत शिवण क्लासचे उद्घाटन केले. या क्लासला शिक्षण प्रसारक मंडळाने ७ शिलाई मशीन्स उपलब्ध करून दिल्या. यानंतर विद्यार्थिनींच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
स. म. शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ज्येष्ठ संचालक भीमराव काळे यांच्याहस्ते रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख, युवराज इनामदार, धैर्यशील रणवरे, रविराज चव्हाण, मिलिंद उघडे, सुरेश पवार, मोहित इनामदार, बाबासाहेब सावंत, अशोक डोके व इतर कर्मचारी उपस्थित होते.
260721\1621-img-20210725-wa0016.jpg
पाटीवस्ती येथील कृष्णानंद विद्यामंदिरात कै.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने वृक्षारोपण करताना बापुराव घुले, मुख्याध्यापक संजय गळीतकर व इतर